शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच हाणामारी

By admin | Updated: June 17, 2014 08:43 IST

एचआयव्ही बाधितांसाठी काम करणार्‍या पॉझिटीव्ह पीपल लिव्हिंग विथ या संस्थेतील आजी व माजी पदाधिकार्‍यांमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आहे.

जळगाव : एचआयव्ही बाधितांसाठी काम करणार्‍या पॉझिटीव्ह पीपल लिव्हिंग विथ या संस्थेतील आजी व माजी पदाधिकार्‍यांमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आहे. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोघा महिला पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयात पोलिसांसमोर एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आसोदा येथील सुंदरबाई कोळी यांनी संस्थेच्या अध्यक्षा बेबीबाई उर्फ अनिता ईश्‍वर पाटील (रा.वाघुळदे नगर) यांच्या विरोधात महिला दक्षता समितीमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीसाठी महिला दक्षता समितीच्या सरला देवरे यांनी सोमवारी दुपारी अनिता पाटील व सुंदरबाई कोळी यांना महिला दक्षता समितीच्या कक्षात बोलविण्यात आले. यावेळी अनिता पाटील यांनी सुंदरबाई यांना तुला दारू पिण्याचे व्यसन होते आणि ते मी सोडविले असे सांगितले. याचा राग आल्याने सुंदरबाई हिने अनिता यांच्या कानशिलात मारली. 
प्रत्युत्तर म्हणून अनिता पाटील यांनीदेखील मारहाण केली. महिला दक्षता समितीच्या कार्यालयातच दोन्ही महिला एकमेकांना मारहाण करीत असल्याने एकच गोंधळ उडाला. महिला पोलिसांनी या दोघींना तंबी देत शांत केले. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले. या प्रकरणी महिला पोलीस सरला देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिता पाटील व सुंदरबाई कोळी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास हे.कॉ.अनिल तायडे करीत आहेत.
अपर पोलीस अधीक्षकांची भेट
हाणामारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा महिला असोसिएशनच्या पदाधिकारी वासंती दिघे, निवेदिता ताठे, महिला व बाल साहाय्य कक्षाच्या शोभा हंडोरे यांनी अपर पोलीस अधीक्षक एन.अंबिका यांची भेट घेतली. 
प्रामाणिकपणे काम करणार्‍या अनिता पाटील यांच्यावर अन्याय होत असल्याचे महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी यावेळी त्यांनी केली.
 
काय आहे वाद? 
■ पॉझिटीव्ह पीपल लिव्हिंग विथ या संस्थेच्या विरोधात काम केल्याने १२ एप्रिल रोजी संचालक मंडळाने ठराव करून सुंदरबाई कोळी व गोसावी यांना उपाध्यक्ष व सचिवपदावर कमी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर कोळी यांना पदावरून कमी करून त्याबाबत प्रकल्प समन्वयक अनिता पाटील यांनी मुंबई येथील आपल्या वरिष्ठांना कळविले होते. 
■ कोळी यांनी विहान प्रकल्पाच्या कार्यालयाच्या तसेच कपाटाच्या चाव्या परत न केल्याने वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांनी परस्परांविरुद्ध शहर पोलीस स्टेशन व जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अश्लील संवाद, फोनवरून धमकी दिल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 
 
महिला दक्षता समितीला अधिकार आहे का? 
या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या अनिता पाटील यांचे एड्सग्रस्तांसाठी मोठे कार्य आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या मिहान प्रकल्पाला शासनाने मान्यता देत निधी दिला आहे. मात्र संस्था हडप करण्याच्या प्रयत्नातील काही लोक त्यांच्यावर खोटे आरोप करीत आहे. संस्थेचा वाद हा धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येणारी बाब आहे. त्यामुळे महिला दक्षता समितीने हा अर्ज घेतला कसा हा गहन प्रश्न आहे. असे ज्येष्ठ समाजसेविका वासंती दिघे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले