खांबात वीज प्रवाह उतरल्याने गाय आणि महिलेचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:15 IST2021-07-21T12:14:33+5:302021-07-21T12:15:09+5:30

ही घटना बुधवारी सकाळी घडली.

Cow and woman due to electric shock in the pole | खांबात वीज प्रवाह उतरल्याने गाय आणि महिलेचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारातील घटना

खांबात वीज प्रवाह उतरल्याने गाय आणि महिलेचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारातील घटना


भुसावळ : वीजपुरवठा करणाऱ्या खांबात वीज प्रवाह उतरल्याने एक गाय आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वराडसीम जोगलखोरी शिवारात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.

वराडसीम जोगलखोरी शिवारातील नरेंद्र विठ्ठलदास लढ्ढा यांच्या मालकीच्या शेतात लोखंडी वीज खांबात वीजप्रवाह उतरला. त्यात गाय आणि कमलबाई सुरेश पाटील नामक महिलेचा मृत्यू झाला.

ग्रामस्थ तसेच पदाधिकारी यांनी या घटनेबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यास माहिती कळविण्यासाठी फोन केला, पण त्यांनी फोन न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ही माहिती पोलीस पाटील सचिन वायकोळे यांनी दिली.

Web Title: Cow and woman due to electric shock in the pole