उधारीच्या पैशावरुन कुरीअर चालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:57 IST2019-06-05T00:57:40+5:302019-06-05T00:57:50+5:30

डांगे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र १० वाजता त्यांचा मृत्यु झाला.

Courier driver's blood on borrowing money | उधारीच्या पैशावरुन कुरीअर चालकाचा खून

उधारीच्या पैशावरुन कुरीअर चालकाचा खून

जळगाव : उधारीच्या पैशावरुन वासुदेव त्र्यंबक डांगे ५२ रा‌. हनुमान नगर या कुरीअर चालकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरात घडली. 

डांगे यांना राजू न्हावी याने फोन करून घरून बोलावून घेतले आणि चौघांनी बेदम मारहाण केली. डांगे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र १० वाजता त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी राजू न्हावी, ईश्र्वर माळी, नीलेश बाविस्कर या तिघांना अटक केली आहे. सतीश भोपाळे हा फरार झाला आहे.

Web Title: Courier driver's blood on borrowing money