वलसाडजवळ कार अपघातात दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:49 IST2019-09-25T18:48:50+5:302019-09-25T18:49:52+5:30
वलसाडजवळ पुलावरून कार कोसळून दाम्पत्य जागीच ठार झाले.

वलसाडजवळ कार अपघातात दाम्पत्य ठार
बोदवड, जि.जळगाव : वलसाडजवळ पुलावरून कार कोसळून दाम्पत्य जागीच ठार झाले. हेमल गादिया व नम्रता गादिया असे या दाम्पत्याचे नाव आहे. यातील महिलेचे माहेर बोदवड येथील आहे. २५ रोजी पहाटे दोनला ही घटना घडला.
बोदवड शहरातील कापड व्यापारी असलेले प्रफुल्ल बुगडी यांची लहान मुलगी नम्रता हिचा विवाह गेल्या आठ महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील वलसाड येथील हेमल गादिया शहा (वय २७) यांच्यासोबत झाला होता. दि.२५ रोजी पहाटे दोन वाजता हेमल हे पत्नी नम्रता (वय २४) हिच्यासोबत घरी वलसाड येथे परतत होते. तेव्हा त्यांच्या कारला अपघात होऊन कार पुलावरून खाली कोसळली. त्यात दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले, तर यात नम्रता ही गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची घटना बुधवारी सकाळी बोदवड येथे समजली.