पती-पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST2021-04-25T04:16:32+5:302021-04-25T04:16:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाने दररोज कुणाचा ना कुणाचा मृत्यू होत असून, एकाच कुटुंबातील अनेकांचा बळी जात असल्याचे ...

The couple became Corona's victims within a week | पती-पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी

पती-पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाने दररोज कुणाचा ना कुणाचा मृत्यू होत असून, एकाच कुटुंबातील अनेकांचा बळी जात असल्याचे समोर येत आहे. शिव कॉलनीत राहणाऱ्या पती- पत्नीचादेखील एकाच आठवड्यात कोरोनाने बळी घेतला आहे. शशिकांत रूपचंद बाविस्कर (६९) व निर्मला बाविस्कर (६२), असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

जिल्ह्यासह शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. एकाच कुटुंबातील अनेकांचा मृत्यू होऊन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. त्यातच शहरातील शिव कॉलनी परिसरात राहणारे जिल्हा परिषदेचे निवृत्त कक्षाधिकारी शशिकांत रूपचंद बाविस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्या काळातच अचानक त्यांची प्रकृती खालावली. दुसरीकडे पत्नी निर्मला बाविस्कर यांनादेखील कोरोनाचे निदान झाले. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १२ एप्रिल रोजी निर्मला बाविस्कर यांचे, तर २० एप्रिल रोजी शशिकांत बाविस्कर यांचा मृत्यू झाला. दोघांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: The couple became Corona's victims within a week