पाच ईव्हीएम सुरु न झाल्याने व्हीव्हीपॅटवर मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:49 IST2019-05-25T11:48:30+5:302019-05-25T11:49:18+5:30
मतमोजणी

पाच ईव्हीएम सुरु न झाल्याने व्हीव्हीपॅटवर मतमोजणी
जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील पाच ईव्हीएम २३ रोजी मतमोजणी वेळी सुरू न झाल्याने (डिस्प्ले न आल्याने) त्या ठिकाणी मतमोजणी व्हीव्हीपॅटद्वारे करण्यात आली.
एरंडोल मधील एक ईव्हीएम, रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर येथील प्रत्येकी एक ईव्हीएम मतमोजणी वेळी बंद पडली होती. यामुळे या यंत्राच्या डिस्प्लेवर मतांची संख्या दिसत नव्हती. यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ज्या ठिकाणची ईव्हीएम मशिन यंत्रे मतमोजणीवेळी बंद असतील, त्याठिकाणची मतमोजणी व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजून करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार मतमोजणी करण्यात आली.