शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:22 PM

कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले.

ठळक मुद्देवेचणी खर्च मजुरीचे न परवडणारे दर यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत

उत्तम काळेभुसावळ : तालुक्यात कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले. त्यातच सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यात कपाशीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तरीही शिवारात पांढºया सोन्याचे चांदणे फुलले आहे. त्यामुळे आर्थिक आधार मिळण्याची आस शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र वेचणी खर्च व सध्या खासगी बाजारपेठेत शेतकºयांची लूट होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे.कापूस वेचणीसह ज्वारी, मका, सोयाबीन आदी सर्वच पिके काढण्यासाठी शेतकºयांना मजुरांची अक्षरश: मनधरणी करावी लागत आहे. शासनाने शासकीय व हमीभाव जाहीर केले असले तरी सर्वच धान्याचे भाव खासगी बाजारपेठेत चांगलेच कोसळले आहेत. कापसासोबतच ज्वारी एक तृतीयांश भावात खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संकटात सापडला आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पांढरे सोने अतिवृष्टीमुळे गोत्यात आले होते. त्याची विक्री करताना शेतकºयांची मोठी दमछाक झाली. तरीही यंदाच्या हंगामात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे राहिले. सुरुवातीला गुलाबी अळीचे ग्रहण लागले. त्याचे उच्चाटन करण्यासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या व्यवस्थापनाचा फायदा झाला. विविध प्रकारची कीटकनाशके फवारणी करून शेतकºयांनी गुलाबी अळीवर नियंत्रण मिळवले, मात्र सध्या कापूस वेचणीला आला असूनही मजूर मिळत नाही. यामुळे शेतकºयांची अक्षरश: दमछाक होत आहे. सध्या कापूस वेचणीचा खर्च मजुरी सात रुपये किलो, रिक्षा भाडे व मध्यस्थी माणसाची दलाली असा जवळपास १० रुपये किलोप्रमाणे खर्च येत आहे. त्यात बी-बियाणे, निंदणी, कोळपणी, खते, रासायनिक खते, पेरणी, फवारणी विविध प्रकारच्या खचार्चा विचार केला तर किमान तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खर्च येत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत मात्र सध्या सीसीआय केंद्र कुठेही सुरू नाही. यामुळे साडेचार ते सहा हजार ६०० रुपये क्विंटलने कापूस घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तर साडेतीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस घेण्यात आला. त्यामुळे शेतकरीवर्ग व्यापारी व मजुरांच्या चांगलाच कचाट्यात सापडल्याचे दिसून येत आहे.आद्रता जास्त असल्यामुळे कापूस खरेदी केंद्रात विलंबकेंद्र शासनाने सीसीआयतर्फे कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी पाच हजार ७२५ रुपये क्लिंटन हमीभावही जाहीर केला आहे. मात्र अद्याप आर्द्रता जास्त असल्यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होणार आहे. अधिक मास असल्यामुळे दिवाळी लांब दिसत असली तरी, हा मोसम दिवाळीचा असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे खासगी कापूस बाजारपेठेत अक्षरश: लूट होत आहे. परिणामी शेतकरीवर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे.सर्वच मालाचे खाजगी बाजारपेठेत भाव कोसळलेकापूस- सीसीआय भाव ५,७२५खासगी बाजारपेठेत ४५०० रुपयेज्वारी शासकीय भाव २४६०खाजगी बाजारपेठेत ८०० ते ९०० रुपयेमका शासकीय भाव १८००; खासगी भाव ११००मूग खासगी बाजारपेठेत केवळ ३५०० ते ४००० रुपयेसोयाबीन खासगी बाजारपेठेत केवळ ३००० रुपयेगहू खासगी बाजारपेठेत १५०० ते १६०० रुपयेसर्वच मालाचे भाव कोसळले असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहेसीसीआयने भुसावळ तालुक्यामध्ये तीन जिनिंगमध्ये नियोजन केले आहे. त्यातील एका जिनिंगमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे.कापसाचे आॅनलाWXन नोंदणी सुरू , ३६ शेतकºयांची झाली नोंदणीकापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसले तरी, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. यावर्षी प्रत्यक्ष शेतकºयांना हजर राहून अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या अर्जासोबत सातबारा उतारा, आधार कार्ड आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येत आहे. अर्ज भरण्यात आल्यानंतर त्या अर्जावर नोंदणी क्रमांक टाकण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसापासून नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ३६ शेतकºयांची नोंदणी झाली आहे.-नितीन पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळआद्रता जास्त असल्यामुळे केंद्र सुरू करण्यास विलंब - कोकाटेकापूस खरेदी करून करण्यासाठी शासनाने नियोजन केले आहे. मात्र सध्या आर्द्रता जास्त असल्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. आर्द्रता कमी होताच कापूस खरेदी सुरू करण्यात येईल.-मयूर कोकाटे, ग्रेडर, सीसीआय केंद्र, भुसावळ

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ