अभय योजनेत मनपाची केवळ ८२ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:22+5:302021-01-19T04:19:22+5:30

जळगाव - कोरोनाकाळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांनादेखील दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. ...

Corporation recovered only Rs 82 lakh in Abhay Yojana | अभय योजनेत मनपाची केवळ ८२ लाखांची वसुली

अभय योजनेत मनपाची केवळ ८२ लाखांची वसुली

जळगाव - कोरोनाकाळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांनादेखील दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेनुसार ७ जानेवारीपासून ते २८ फेब्रुवारीअखेरपर्यंत मालमत्ताकराची थकबाकी भरल्यास शास्ती अर्थात दंडाच्या रकमेवर तीन टप्प्यांत ७५ टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. ७ जानेवारपासून ते १८ पर्यंत मनपाची ८२ लाखांची वसुली झाली आहे. अभय योजनेला जो पाठिंबा मिळायला हवा होता, तो मिळताना दिसून येत नाही. अजूनही जळगाव मनपाची केवळ ४५ टक्के वसुली झाली असून, गेल्या वर्षाची व या वर्षाची वसुलीची स्थिती पाहिल्यास तब्बल ५५ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे मनपाला उर्वरित अडीच महिन्यांत ५५ कोटींची वसुली करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

Web Title: Corporation recovered only Rs 82 lakh in Abhay Yojana