शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 02:04 IST

दागिन्यांची मोड नाही की तारण नाही; ऐन शेती मशागतीच्या काळात हाती पैसा नसल्याने चिंता

जळगाव : लॉकडाऊन दरम्यान सुवर्णबाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यवसायिकांसह बळीराजालाही बसत आहे. शेती मशागतीसाठी घरातील दागिन्यांची मोड करणे वा ते तारण ठेवून पैसा उभा करण्याचे साधन असलेल्या सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.कोरोनामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था अस्थिर झाली असताना भारताचीही तीच स्थिती आहे. शेतीदेखील संकटात सापडली आहे. खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या काळातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने ही कामे ठप्प झाली आहे. या कामासह बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेऊन आपली कामे करीत असतो. या सोबतच मिळणाºया कर्जात शेतीकामांचा खर्च भागणे शक्य नसल्याने शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोने-चांदीचे दागिने मोडून अथवा तारण ठेवून पैसा उभा करतो.घरात बसण्याशिवाय पर्याय नाहीकापूस असो की इतर रब्बी हंगामातील माल विकता येत नाही. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने दागिन्यांची मोड करता येत नाही की ते तारण ठेवता येत नाही. त्यामुळे बळीराजाला घरातच बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.जास्त भाव असूनही मोड करता येईनाकधी नव्हे एवढ्या उच्चांकीवर सोन्याचे भाव पोहोचल्याने शेतकऱ्यांना मोड करताना फायदा होणार होता. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव ४२ हजार ते ४४ हजारादरम्यान राहिले. त्यामुळे त्याचा फायदा मोड करताना झाला असता व बळीराजाच्या हाती अधिक पैसा पडला असता. मात्र, यंदा सुवर्णपेढ्याच बंद असल्याने ना मोड, ना जास्त भावाचा फायदा करता आला नाही.खरेदी व मोडचा हंगामएप्रिल-मे महिन्यात मशागतीसह लग्नसराईदेखील असते. त्यामुळे लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होते. शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळाले तरी, ते हजारात असते व शेताला खर्च लाखात लागतो, त्यामुळे दागिने मोडसाठी शेतकरी सुवर्णपेढ्याकडे जातो. परिणामी, सुवर्णबाजारात दुहेरी उलाढाल या काळात होत असते.शेतीच्या अर्थकारणासाठी दुकानांना वेळ ठरवून द्या२० एप्रिलपासून सरकार विविध क्षेत्रातील कामांना सुरुवात करण्याचे संकेत देत आहे. त्यात शेतीशी निगडित अनेक कामे आहे. सुवर्णपेढ्याही सुरू करण्याची मागणी शेतकºयांसह सुवर्ण व्यावसायिकदेखील करीत आहेत. यासाठी वेळा निश्चित करून दिल्या तरी शेतकºयांना मोठा आधार होईल व शेतीचे अर्थकारण सुरू होईल, असाही सूर उमटत आहे.एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी असतेच. सोबतच शेती मशागतीच्या कामासाठीदेखील शेतकरी त्यांच्याकडील दागिने विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या दिवसात ही दुहेरी उलाढाल होते. मात्र, यंदा सुवर्णपेढ्या बंद असल्याने हे सर्व व्यवहार ठप्प आहेत.- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन.कापूस तसेच इतर पिके पडून आहे. त्यात सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकºयांना दागिने विकता वा तारण ठेवता येत नसल्याने शेती मशागतीसाठी पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न पडला आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, असोदा, ता. जळगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीGoldसोनं