शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

coronavirus: कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 23:53 IST

मालती नेहते या १ जून रोजी ४.३० वाजता भुसावळ रेल्वे दवाखान्यातून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला व त्यात त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र २ जून रोजी मालती नेहते या रुग्णालयातून निघून गेल्याची नोंद होती.

जळगाव - कोरोनाबाधित मालती चुडामण नेहते (८२) या वृध्देच्या मृत्यूप्रकरणी सामान्य रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्र. ७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉय व इतर संबंधित अधिकारी व कर्मचाºयांविरुध्द रात्री दहा वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला.

रुग्णालयाचे विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील चंद्रकांत कळसकर (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मालती नेहते या १ जून रोजी ४.३० वाजता भुसावळ रेल्वे दवाखान्यातून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला व त्यात त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र २ जून रोजी मालती नेहते या रुग्णालयातून निघून गेल्याची नोंद होती. त्याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कळविण्यात आले होते. बुधवार दि.१० रोजी वैद्यकिय अधिकारी म्हणून ड्युटीला असताना डॉ.किरण पाटील यांनी वॉर्ड क्र. ७ मध्ये बोलावले असता तेथील स्वच्छतागृहात एक महिला मृतावस्थेत आढळून आलेली होती. याबाबत पोलिसांना कळविले असता ही महिला मालती नेहते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस रुग्णालयाच्या वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून त्यांनी कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अकबर पटेल करीत आहेत.

गुन्हा दाखल होईपर्यंत डॉ.रोहन पोलीस ठाण्यात

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीनंतर मालती नेहते यांच्या मृत्यूबाबत जबाबदारी निश्चित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. वॉर्ड क्र.७ मधील संपूर्ण स्टापविरुध्द ठपका ठेवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील कळसकर यांना प्राधिकृत करण्यात आले. कळसकर यांच्यासह डॉ.किरण पाटील व डॉ.दत्तात्रय बिराजदार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन हे देखील दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतरच डॉ.रोहन यांनी पोलीस ठाणे सोडले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगावDeathमृत्यू