विद्यापीठातील कक्ष अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST2021-04-06T04:14:45+5:302021-04-06T04:14:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शनिवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र ...

Coronation death of university cell officer | विद्यापीठातील कक्ष अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

विद्यापीठातील कक्ष अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शनिवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त विभागातील कक्ष अधिकारी नीळकंठ तुळशीराम अहिरराव (५८, रा. महाबळ) यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. याआधी विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पंधरा-वीस दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे अहिरराव यांनी कोरोना चाचणी केली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या शासकीय पॉलिटेक्निक येथील कोविड केअर सेंटरला उपचारार्थ दाखल केले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर काही दिवसांनी ते घरी परतले. मात्र, पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्‍यात आले. रविवारी त्यांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अहिरराव यांच्या निधनाने अहिरराव कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.

Web Title: Coronation death of university cell officer