शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

पाचोऱ्यात दोनशे रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:39 PM

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सर्रासपणे दोनशे रुपयांत चाचणी न घेता ‘निगेटिव्ह’चे रिपोर्ट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या नावाखाली गोरखधंदा सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : कोरोनाच्या नावाखाली बरेच गोरखधंदे सुरू झाले असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्यांनाच विविध कार्यालयात कामकाज करण्यासाठी प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी कोरोनाची टेस्ट करणे  सक्तीचे केले असून, नागरिकांना कोरोना टेस्टसाठी आता पैसे मोजावे लागत आहेत. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सर्रासपणे दोनशे रुपयांत चाचणी न घेता ‘निगेटिव्ह’चे रिपोर्ट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

एकीकडे  कोरोनाची चाचणी घेणे बंधनकारक केलेले असताना दुसरीकडे मात्र चाचणी घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना चाचणी न करता सरळ दोनशे रुपयांत सर्टिफिकेट जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे सर्रासपणे निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन नागरिक दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय व इतर शासकीय कार्यालय, बँकांमध्ये त्याचा वापर करून आपले काम भागवत आहेत. तसेच बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठीही अशा सर्टिफिकेटचा उपयोग करून नागरिक सहीसलामत कामे करून घेत आहेत. यामुळे अशा बोगस सर्टिफिकेटमुळे कोरोनाबाधित असलेलेदेखील निगेटिव्ह दाखवून वावरताना दिसत आहेत. यावर कुणाचाही वचक नसल्याने असे उद्योग बिनधास्तपणे चालू आहे.दरम्यान, रॅपिड टेस्टच्या किट संपल्या, असे दर्शविण्यात येते व याच किट खासगीत, तसेच इतर रुग्णालयात वापरल्या जातात,  त्याचीही वसुली केली जाते. यामुळे शासनाचीही फसवणूक होत असून, नागरिकांची  पिळवणूक होत आहे. अशा  कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सुज्ञ नागरिकांची अपेक्षा आहे. 

कोरोना चाचणी १२ वाजेपर्यंत घेतली जाते. चाचणीच्या अहवालासाठी नागरिक आग्रह धरत असावेत. अशावेळी कर्मचारी परस्पर शुल्क घेत असतील तर कारवाई करावी लागेल.-डॉ. अमित साळुंखे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पाचोरा.

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराcorona virusकोरोना वायरस बातम्या