चाळीसगावला गौरवाने कोरोना योद्धे भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 14:05 IST2021-06-08T14:04:13+5:302021-06-08T14:05:00+5:30

चाळीसगाव  : गेल्या चौदा महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेशी सामना करतांना तिस-या लाटेशीही दोन हात करण्याची तयारी असणा-या येथील ...

Corona warriors proudly overwhelmed Chalisgaon | चाळीसगावला गौरवाने कोरोना योद्धे भारावले

चाळीसगावला गौरवाने कोरोना योद्धे भारावले



चाळीसगाव  : गेल्या चौदा महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेशी सामना करतांना तिस-या लाटेशीही दोन हात करण्याची तयारी असणा-या येथील कोरोना उपचार केंद्रातील कोरोना योद्धांचा काँग्रेसतर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. यागौरव सोहळ्याने हे योद्धे भारावले. आकर्षक भेटवस्तू व मिठाई देऊन हा गौरव केला गेला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोल व ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस, म. फुले शिक्षण मंडळाचे सचि अशोक हरी खलाणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा येथे झाला.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिल निकम, रमेश शिंपी, अशोक खलाणे, ईश्वर जाधव, देवेंद्रसिंग पाटील, प्रदीप देशमुख, अल्ताफ शेख, रवींद्र जाधव, अदित्य खलाणे, अभिजीत खलाणे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदार करंबेळकर आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या मंडळाने ग्रामीण रुग्णालयातील अडअडचींवरही चर्चा केली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आरोग्य कर्मचा-यांसोबत आहे. असे यावेळी अशोक खलाणे यांनी अश्वासित केले.

Web Title: Corona warriors proudly overwhelmed Chalisgaon