कोरोना सावट आणि खरिपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:54 PM2020-05-02T18:54:19+5:302020-05-02T18:55:49+5:30

कोरानाच्या सावटातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

Corona savat and kharif preparation | कोरोना सावट आणि खरिपाची तयारी

कोरोना सावट आणि खरिपाची तयारी

Next

मतीन शेख
मुक्ताईनगर : कोरानाच्या सावटातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचीनांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतक?्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकऱ्यांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अद्यापही शेतकºयांच्या घरात कापूस भरून आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
खरीप तसेच रब्बी हंगामही तोट्यात गेल्याने यावर्षी शेतकºयांचे आर्थिक गणित चुकले आहे. त्यामुळे आता शेतकºयांची पुढील हंगामावार सर्व मदार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागतीच्या कामाला लागले आहे.
बैलजोड्या मिळेनात
दिवसेंदिवस शेती करणे कठीण झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास बैलजोडी, चारा, शेती साहित्य आदी घ्यावे लागते.
खरीप पूर्वी अनेक शेतकरी नवीन बैलजोडी बदल करण्यास खरेदी विक्री करतात तर बरेच शेतकरी हंगाम संपल्यावर बैलजोडी विकून नव्या खरिपात नवी बैलजोडी खरेदी करतात यंदा २४ मार्च पासून लॉकडाउनमुळे बाहेरील शेतीपयोगी जनावरे खान्देशात आलीच नाही. त्यामुळे बैलजोडीचे दर कमालीचे वधारले आहेत. त्यामुळे आता शेतकरी कमीत कमी त्रासामध्ये शेतकरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. मात्र प्रत्येक शेतकºयांनाच आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने ते कमी पैशामध्ये पारंपरिक पद्धतीनेच शेतीची मशानगत करीत आहे.
लॉकडाऊने कंबरडे मोडले
यावर्षी अवकाळी पावसाने शेतकºयांचा पिछा सोडला नाही. प्रथम खरीप आणि त्यानंतर रब्बीनेही होत्याचे नव्हते झाले. यातून कसेबसे सावरत नाही तोच लॉकडाऊन झाले आणि त्यांना जराशीही हालचाल करता आली नाही. परिणामी पुढील हंगाम कसा करायचा, हा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. दुसरीकडे अनेक शेतकºयांना आपल्याकडील पिकवलेले धान्य तसेच कापूसही विकता आला नाही.
शेतातही सोशल डिस्टन्सिंग
एरवी मशागतीसाठी जाणारे शेतकरी नवा हंगाम बहरेल ही सकारात्मक ऊर्जा घेऊन शेती कामाला लागतात. अशात कोरोना संक्रमणाचा भय शेतात ही कायम आहे. शेतकरी मजूर शेताच्या मशागतीसाठी काम करताना आवर्जून मास्कचा वापर करताना व एकमेकांपासून अंतर राखून काम करताना दिसून येत आहे.

Web Title: Corona savat and kharif preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.