चाळीसगावचे वैद्यकीय आधिक्षक कोरोना पाॕझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:19 IST2021-02-22T18:18:50+5:302021-02-22T18:19:27+5:30

तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांचा कोरोना तपासणी अहवाल पाॕझिटीव्ह आला आहे.

Corona Positive, Medical Superintendent, Chalisgaon | चाळीसगावचे वैद्यकीय आधिक्षक कोरोना पाॕझिटीव्ह

चाळीसगावचे वैद्यकीय आधिक्षक कोरोना पाॕझिटीव्ह

ठळक मुद्देप्रतिबंधक लसीचे घेतले होते दोन डोस

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तथा तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांचा कोरोना तपासणी अहवाल पाॕझिटीव्ह आला असून सोमवारी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. बाविस्कर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दहा महिन्यांपासून आघाडीवर असणारे कोरोना योद्धा डॉ. बी.पी. बाविस्कर हे कोरोना पाॕझिटीव्ह झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यानंतर चाळीसगावातील पहिली लस त्यांनीच घेतली होती. आठ दिवसांपूर्वी त्यांनी प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसही घेतला होता. लसीचे दोन डोस घेऊनही ते कोरोना पाॕझिटीव्ह झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांमधून लसीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Corona Positive, Medical Superintendent, Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.