अमळनेर येथील कोरोनाबाधित वृध्दाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:54 IST2020-04-27T11:54:09+5:302020-04-27T11:54:40+5:30

जिल्ह्यात मृतांची संख्या पाच : अमळनेरातील कोरोनाचा चौथा बळी जळगाव : अमळनेर येथील कोरोनाबाधित ६६ वर्षीय वृध्दाचा रविवारी रात्री ...

Corona patient death | अमळनेर येथील कोरोनाबाधित वृध्दाचा मृत्यू

अमळनेर येथील कोरोनाबाधित वृध्दाचा मृत्यू

जिल्ह्यात मृतांची संख्या पाच : अमळनेरातील कोरोनाचा चौथा बळी
जळगाव : अमळनेर येथील कोरोनाबाधित ६६ वर्षीय वृध्दाचा रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोरोना रुग्णालयात मृत्यू झाला. या वृध्दाला २४ एप्रिलला कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमळनेरातील शाहआलम नगरातील हा दुसरा तर अमळनेर शहरातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने पाच बळी गेले आहेत.
दरम्यान, अमळनेर येथील मृत वृध्दाला हृदयविकार होता. तसेच त्यांचे वजनही वाढलेले होते. जिल्ह्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अमळनेरातील १३ रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी 'लोकमत'ला  दिली.

Web Title: Corona patient death

टॅग्स :Jalgaonजळगाव