एरंडोल तालुक्यातील दोघांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:39 IST2020-05-24T16:39:51+5:302020-05-24T16:39:57+5:30

वरखेड आणि उत्राण येथे प्रत्येकी एक पॉझिटीव्ह

Corona obstruction to two in Erandol taluka | एरंडोल तालुक्यातील दोघांना कोरोनाची बाधा

एरंडोल तालुक्यातील दोघांना कोरोनाची बाधा


एरंडोल: तालुक्यात तालुक्यात वरखेड व उत्राण येथे दोन पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येते.
एरंडोल तालुक्यातील वरखेड येथील ७१ वर्षे पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला. ते तीन दिवसापूर्वी परस्पर जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते. तसेच उत्राण येथील ४५ वर्षे वयाचा पुरुष पॉझिटिव्ह आहे परंतु सदर व्यक्ती मार्च महिन्यापासून मुंबई येथे इस्पितळात उपचार घेत आहे. त्यांचा तालुक्यात मार्च महिन्यापासून काहीएक संपर्क नाही.

Web Title: Corona obstruction to two in Erandol taluka