कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:11+5:302021-03-24T04:15:11+5:30

पाच बंदी बाधित : सरकारी रुग्णालयात हलविले जळगाव : जिल्हा कारागृहातही कोरोनाने शिरकाव केला असून मंगळवारी पाच बंदी बाधित ...

Corona infiltrated the prison as well | कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

पाच बंदी बाधित : सरकारी रुग्णालयात हलविले

जळगाव : जिल्हा कारागृहातही कोरोनाने शिरकाव केला असून मंगळवारी पाच बंदी बाधित असल्याचे आढळून आले. दरम्यान, या सर्वांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी देखील कारागृहात बंदी बाधित आढळून आले होते.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेला असून सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी बाधित आढळून येत आहेत. अशातच मंगळवारी जिल्हा कारागृहात पाच बंद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनात आले. कारागृहाचे अधीक्षक अनिल वांढेकर व तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन रुग्णांना दाखल करून घेण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सायंकाळी या पाच जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका बंद्याला जामीन झालेला असल्याने त्याची कारागृहातून सुटका झालेली आहे. परंतु तो बाधित असल्याने कारागृह प्रशासनानेच त्याला रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Corona infiltrated the prison as well