कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना ! आज पुन्हा आढळले १६८ कोरोना बाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 19:28 IST2020-07-02T19:27:57+5:302020-07-02T19:28:08+5:30

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत चालली आहे. ...

Corona infection will not stop! Today, 168 corona-infected patients were found again | कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना ! आज पुन्हा आढळले १६८ कोरोना बाधित रूग्ण

कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना ! आज पुन्हा आढळले १६८ कोरोना बाधित रूग्ण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत चालली आहे. गुरूवारी एका दिवसात तब्बल १६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २२, जळगाव ग्रामीण ०८, अमळनेर १६, भुसावळ ०३, भडगाव ०१, बोदवड ०९, चाळीसगाव ०५, चोपडा ०९, धरणगाव १०, एरंडोल १९, जामनेर ०४, मुक्ताईनगर ०८, पाचोरा ०५, पारोळा ०२, मुक्ताईनगर ०८, यावल ३१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ७९८ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

Web Title: Corona infection will not stop! Today, 168 corona-infected patients were found again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.