सावधान शहरात कोरोना वाढतोय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:34+5:302021-01-08T04:46:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील अन्य भागात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी जळगाव शहरात मात्र, सातत्याने ...

सावधान शहरात कोरोना वाढतोय..
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील अन्य भागात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी जळगाव शहरात मात्र, सातत्याने रुग्णवाढ समोर येत आहे. गेल्या सहा दिवस सलग जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरातच आढळून येत आहेत. गेल्या ६ दिवसात शहरात ११६ नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे.
कोरोना काळात जळगाव शहर हे सुरूवातीपासूनच हॉटस्पॉट राहिले आहे. सप्टेबर महिन्यापासून सर्वत्रच कोरोना कमी होत असताना जळगावात मात्र, सातत्याने रुग्ण समोर येत आहेत. यात जानेवारीचा विचार केलेल्यास सहा पैकी तीन दिवसात वीस किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहरात चाचण्या अधिक होत असल्याने रुग्णही अधिक समोर येत असल्याचाही एक निष्कर्ष काढला जात आहे. मात्र, कोरोना संपला नसून अद्यापही कोरोनाचा संसर्ग कायम असल्याचे यातून समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता पुरेशी काळजी घेणे आजही आवश्यक असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करीत आहेत.
कोरोनात शहरच टाॅपवर
२३ टक्के रुग्ण - १३११५
२१ टक्के मृत्यू - २८८
४७ टक्के सक्रिय रुग्ण -२७६
सहा दिवसातील रुग्ण
१ जानेवारी-२२
२ जानेवारी-०९
३ जानेवारी-१७
४ जानेवारी-२९
५ जानेवारी-३१
६ जानेवारी-०८
सर्वच भाग व्यापले
शहरातील जवळपास सर्वच भाग कोरोनाने व्यापले आहेत. प्रत्येक भागात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मध्यंतरी हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्ये मात्र कोरोना नियंत्रणात असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र, शहरातील विविध भागात आढळणारे रुग्ण म्हणजे संसर्ग सर्वत्र झाला असल्याचे दर्शवितात. असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.