कोरोनाचा विस्फोट ; ८७० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:41 IST2020-08-21T19:41:18+5:302020-08-21T19:41:28+5:30
जळगाव : शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट झाला. एकाच दिवसात तब्बल ८७० नवे रुग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरात ...

कोरोनाचा विस्फोट ; ८७० नवे रुग्ण
जळगाव : शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट झाला. एकाच दिवसात तब्बल ८७० नवे रुग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरात तब्बल २२२ रुग्णांचा समावेश आहे. तेरा बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांनीही उच्चांक गाठला असून आज ५६६ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
मृत्यूदर घटून ३़३८ टक्क््यांवर आला आहे. चाचण्यांची संख्या ९४ हजारांवर पोहचली आहे़ शुक्रवारी ४१२४ अहलवा निगेटीव्ह आले आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात ऐवढ्या तपासण्या या प्रथमच झालेल्या आहेत.