कोरोना आला अन् डेंग्यू गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:26+5:302021-02-05T06:00:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात अन्य आजारांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र असताना शहरातही डेंग्यूच्या बाबतीत तसेच काहीसे चित्र ...

Corona came and went dengue | कोरोना आला अन् डेंग्यू गेला

कोरोना आला अन् डेंग्यू गेला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात अन्य आजारांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र असताना शहरातही डेंग्यूच्या बाबतीत तसेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. डेंग्यूची तपासणी करतानाच तारांबळ उडत असल्याने २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १९४ नमुने कमी संकलित करण्यात आले व त्यामुळे रुग्णांची संख्या घटून १९ आली आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत ही सर्वांत कमी संख्या आहे.

कोरोना व डेंग्यूची लक्षणे साधारण सारखीच असल्याने रुग्ण व यंत्रणा या दोघांची यात तारांबळ उडाल्याचे २०२० मध्ये चित्र होते. शिवाय नॉन कोविड यंत्रणा तेवढी सक्रिय नसल्याचे अनेक उदाहरणांवरून समोर आले होते. महापालिकेच्या प्रशासनाकडून नियमित हवी तशी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आली नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. खासगीकडून माहिती मिळत नसल्यानेही ही संख्या कमी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे डेंग्यूची सर्वात कमी रुग्णसंख्या २०१९ मध्ये नोंदविण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे.

कुठल्या वर्षात किती पेशंट

२०१६ - २६

२०१७ - २०

२०१८- १५७

२०१९ - १२९

२०२०२ - १९

डेंग्यूचे सर्वेक्षण केवळ कागदावर

महापालिका प्रशासनाकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी कोरोना काळात केवळ कागदावरच सर्वेक्षण करण्यात आल्याचे चित्र आहे. अनेक भागांमधून तशा तक्रारीही समोर आल्या होत्या. सर्वेक्षण कमी असल्यानेच डेंग्यूच्या तपासणीसाठी रुग्णांचे रक्तसंकलनाचे प्रमाण गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी प्रमाण नोंदविण्यात आले आहे. केवळ ३५ जणांचेच रक्तनमुने वर्षभरात तपासणीला पाठविण्यात आले. त्यात १९ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, गेल्या चार वर्षांत २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांत अनुक्रमे १५७ आणि १२९ एवढे रुग्ण आढळून आले होते.

डेंग्युची लक्षणे

१ डेंग्यूची लागण झाल्यानंतर रुग्णाला एकदम जोराचा ताप येतो

डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखतो.

चव आणि भूक नष्ट होणे

छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येतात, मळमळणे आणि उलट्या, त्वचेवर व्रण उठणे, आदी काही डेंग्यूची लक्षणे

२ डेंग्यूची अधिक लागण झाली असल्यास याचे काही गंभीर लक्षणेही समोर येतात. त्यात तीव्र, पोटदुखी, त्वचा फिकट, थंड होणे. नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, अस्वस्थता, काही रुग्णांना रक्ताच्या उलट्या होणे, श्वास घेताना त्रास होणे या गंभीर लक्षणांचा यात समावेश असतो.

Web Title: Corona came and went dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.