चाळीसगावला विषारी पदार्थ सेवन केल्याने प्रेमीयुगुलाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:25 IST2018-02-26T15:25:00+5:302018-02-26T15:25:00+5:30

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली होती प्रियकराविरोधात चाळीसगाव पोलिसात फिर्याद.

By consuming poisonous substances in Chalisgaon, the condition of lover is serious | चाळीसगावला विषारी पदार्थ सेवन केल्याने प्रेमीयुगुलाची प्रकृती गंभीर

चाळीसगावला विषारी पदार्थ सेवन केल्याने प्रेमीयुगुलाची प्रकृती गंभीर

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद पोलिसात दाखलदोघेही चार ते पाच दिवसांपासून गायबरविवारी सायंकाळी हनुमान वाडी परिसरात दोघेही विष घेतलेल्या स्थितीत आढळले.

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.२६ : घरातून गायब झालेल्या एका अल्पवयीन मुलीसह तिच्यासोबतच पळून गेलेल्या ४५ वर्षीय प्रियकरही विष प्राशन केल्याच्या स्थित आढळल्याने दोघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून ही घटना रविवारी सायंकाळी हनुमानवाडीत घडली.
चाळीसगाव शहरातील एका ४५ वर्षीय इसमाने त्याच्या घराजवळच व राहणा-या इयत्ता दहावीत शिकणा-या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमीष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद अशोक हिरामण पाटील यांनी २१ रोजी चाळीसगाव शहर पोलिसात नोंदवली होती. हे दोघेही गेल्या चार ते पाच दिवसापासून गायब होते. रविवारी सायंकाळी हनुमानवाडी परिसरात दोघेही विष घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. काही जणांनी त्यांना खासगी रुग्णालयात आणले. डॉ. जयवंतराव देवरे यांनी रात्री दहा वाजता त्यांच्यावर उपचार सुरु केले. दोघांनाही मोठ्या प्रमाणात विषारी द्रव सेवन केल्याने प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.

Web Title: By consuming poisonous substances in Chalisgaon, the condition of lover is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.