ग्राहकांना वाटले पेढे, मोटारसायकला दिली प्रतिकात्मक फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST2021-06-09T04:21:40+5:302021-06-09T04:21:40+5:30

भाजपा मोदी सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनात पाचोरा काँग्रेसने येथील पेट्रोल पंपावर एकत्र येत केंद्र सरकारवर टीका ...

Consumers felt benches, symbolic hanging given to motorcycles | ग्राहकांना वाटले पेढे, मोटारसायकला दिली प्रतिकात्मक फाशी

ग्राहकांना वाटले पेढे, मोटारसायकला दिली प्रतिकात्मक फाशी

भाजपा मोदी सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनात पाचोरा काँग्रेसने येथील पेट्रोल पंपावर एकत्र येत केंद्र सरकारवर टीका केली आणि घोषणा देत अनोखे आंदोलन केले. यावेळी ‘अच्छे दिन’ आले, असे म्हणत आणि केंद्र सरकारचा उपहास करत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेढे वाटण्यात आले तर पेट्रोल दरवाढीमुळे मोटारसायकलला प्रतिकात्मक फाशीदेखील देण्यात आली.

तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, जगदीश ठाकरे, शिवराम पाटील, शीला सूर्यवंशी, सागर वाघ, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, इस्माईल तांबोळी, सागर पाटील, संदीप पाटील, मदन देवरे उपस्थित होते.

===Photopath===

080621\08jal_11_08062021_12.jpg

===Caption===

ग्राहकांना वाटले पेढे, मोटारसायकला दिली प्रतिकात्मक फाशी

Web Title: Consumers felt benches, symbolic hanging given to motorcycles