दवाखान्याचे बांधकाम साहित्य लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:52+5:302021-03-23T04:16:52+5:30

जळगाव : पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या दवाखान्याचे बांधकाम ठिकाणाहून स्वीच व इलेक्ट्रिक वायर असा एकूण १३ हजार रूपयांचा ...

The construction materials of the hospital were lengthened | दवाखान्याचे बांधकाम साहित्य लांबवले

दवाखान्याचे बांधकाम साहित्य लांबवले

जळगाव : पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या दवाखान्याचे बांधकाम ठिकाणाहून स्वीच व इलेक्ट्रिक वायर असा एकूण १३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना २१ मार्च रोजी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. राहुल अरुण चिरमाडे (वय ३७, रा. जानकी नगर, गणेशवाडी) यांचे नवीन पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दवाखान्याचे बांधकाम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी दवाखान्याचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाहून ३२ नग एमसीबी स्विच आणि १०० फूट इलेक्ट्रिक वायर असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी डॉ. राहुल चिरमाडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.

Web Title: The construction materials of the hospital were lengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.