शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

विद्यार्थ्यांना दिलासा ! आता २७ सप्टेंबरपर्यंत भरता येणार विकल्प अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 2:52 PM

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी आता२७ ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी आता२७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिसाला मिळाला आहे.विद्यापीठाने एम.के.सी.एल. द्वारे विकसित डीयू पोर्टल (विद्यापीठाच्या http://numj. digitaluniversity.ac  या संकेतस्थळावर) विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा अकांउट मध्ये विकल्प  पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  यापुर्वी १९ सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अजूनही विद्यार्थ्यांना अर्ज भरत असताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने २७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

विकल्प अर्ज भरून देणेसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://numj.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर जाऊन ई-सुविधा अकाऊंटमध्ये विलींगनेस टू ॲपियर इन एक्झाम या लिंक ला क्लिक करून विकल्प सादर करायचा आहे. सदर विलिंकगनेस अर्ज फक्त २०१९-२० मध्ये पदवी, पदविका आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षात प्रविष्ठ असलेल्या किंवा अंतिम वर्ष उत्तीर्ण, अनुत्तीर्ण होऊन मागील सत्र , वर्षातील असलेल्या विद्यार्थ्यांनी भरावयाचे आहे.   

रेग्यूलर विषय दिसेना...अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचा सामना तर करावा लागत आहे. दुसरीकडे हॉलकितिकटमध्ये मागील विषय उत्तीर्ण असताना तो विषय नापास दाखविण्‍यात आला आहे तर काही हॉलतिकिटमध्‍ये रेग्युलर विषयचं दाखविल्यात आले नसल्याचाही प्रकार समोर येत आहे. त्यामुळे परीक्षांच्या आधी संपूर्ण अडचणी सोडविण्‍याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव