शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला 
2
...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी
3
नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या
4
फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 
5
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
6
T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी
7
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
8
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
9
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
10
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
11
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
12
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
13
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
14
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
15
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
16
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
17
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
18
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
19
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस जळगावमधील फैजपूर येथून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:10 PM

काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. फैजपूर, भुसावळ व बोदवड येथे सभांचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देफैजपूरला ऐतिहासिक पार्श्वभूमीजळगावात साधणार संवाद भुसावळच्या सभेत इम्रान प्रताप गढी मार्गदर्शन करणार

फैजपूर, जि. जळगाव : काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. फैजपूर, भुसावळ व बोदवड येथे सभांचेही आयोजन करण्यात आले आहे.फैजपूर येथे १९३६ मध्ये कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दुस-या टप्प्यातील रॅलीचा शुभारंभ फैजपूर येथून करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात ही रॅली काढण्यात येत आहे. यासाठी फैजपूर येथे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि ५० आमदार उपस्थित आहेत.फैजपूरमध्ये सभा झाल्यानंतर मुक्ताईनगरमार्गे बोदवडकडे ही रॅली रवाना होईल. बोदवड येथे दुपारी ३.३० रॅली व सभा होईल. आणि भुसावळमध्ये सायंकाळी ६.३० वाजता सभा होणार आहे. भुसावळच्या सभेत इम्रान प्रताप गढी मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर रात्री ९ वाजता जनसंघर्ष यात्रा जळगावात मुक्कामी येईल.

जळगावात साधणार संवादजळगाव येथे ५ रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळात शहरातील अधिवक्ता, डॉक्टर व इतर व्यासायिकांशी अशोक चव्हाण व अन्य पदाधिकारी संवाद साधणार आहेत. यांनतर एरंडोल येथे सकाळी १०.४५ वाजता सभा व त्यानंतर पारोळ्याकडे ही रॅली जाईल. पारोळा व त्यानंतर अमळनेर येथे रॅलीचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन केले आहे.

फैजपूरला ऐतिहासिक पार्श्वभूमीकॉँग्रेसची १८८५ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर पक्षाचे ५१ वे राष्टÑीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे १९३६ मध्ये घेण्याचा निर्णय पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता. ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन फैजपूर येथे झाल्याने एक ऐतिहासिक दर्जा या गावाला प्राप्त झाला. त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या सारख्या दिग्गज मंडळी दोन दिवस फैजपूर येथे होत्या. ही ऐतिहासीक पार्श्वभूमी फैजपूरला असल्यामुळे पक्षाने आपल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसºया टप्प्याला फैजपूर येथून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव