राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:59 IST2018-12-26T21:57:15+5:302018-12-26T21:59:13+5:30
राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात काँग्रेसची निदर्शने
जळगाव : राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जॉईंट पार्लमेंट कमिटी अर्थात जेपीसी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणावर बोलण्यास तयार नाहीत. जेपीसीमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली तर आपण अडकू तसेच सत्य जनतेसमोर येईल, अशी भीती त्यांना असल्याचा आरोपही काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे उपस्थित होते.