दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:17+5:302020-12-04T04:45:17+5:30
केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण तथा अन्यायकारक कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत पुकारलेल्या देशव्यापी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गुरुवारी ...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन
केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण तथा अन्यायकारक कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत पुकारलेल्या देशव्यापी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रावेर तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील व आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी दिलरूबाब तडवी, भंवर कुवर, प्रतिभा मोरे, मानसी पवार आदींनी केंद्र सरकारच्या शेतकरी हिताविरुद्धच्या धोरणांवर टीका केली. अन्यायकारक कायदे रद्दबातल करण्याची मागणी करून केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.
यावेळी काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अनुसूचित जाती सेलचे क्षेत्रप्रमुख राजीव सवर्णे, शहराध्यक्ष डॉ. शब्बीर शेख, माजी तालुकाध्यक्ष यशवंत धनके, जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दिलरूबाब तडवी, जिल्हा अनुसूचित जाती सेलच्या महिला उपाध्यक्ष प्रतिभा मोरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनीषा पाचपांडे, कांताबाई बोरा, एस. आर. चौधरी, डॉ. पी. जी. पाटील, वाय. एस. महाजन, शिवाजी येवले, संतोष पाटील, प्रतीक खराले, सलीम शेख, रामदास लहासे, प्रकाश सुरदास, शबाना तडवी, रमेश कदम, पंकज सुपे, गुलशेर तडवी, सावन मेढे, धुमा तायडे, संजय जमादार, राजेंद्र चौधरी, शशिकांत भालेराव, ज्ञानेश्वर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
031220\03jal_3_03122020_12.jpg
===Caption===
रावेर येथे आंदोलनात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते.