काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे देणार स्वबळाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST2021-06-23T04:12:51+5:302021-06-23T04:12:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात आगामी स्थानिक ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे देणार स्वबळाचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव त्यांना देऊ, अशी माहिती काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. नाना पटोले यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दरम्यान, भाजपमधील अनेक पदाधिकारी हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. महानगराध्यक्षपद रिक्त राहणार नाही, याबाबत मुंबईत चर्चा झाल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले. फैजपूर येथे काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले असल्याने नाना पटोले यांनी आंदोलनासाठी फैजपूरची निवड केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी काळात काही मोठे चेहरे काँग्रेसमध्ये येणार असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी प्रदेश सचिव डी.जी. पाटील, युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हेमंत पाटील आदी उपस्थित होते.