Congress supports farmers' agitation | शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जळगाव : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जिल्हा काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिला आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात कांग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी एन.एस.यु.आयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे उपस्थित होते.

दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण राज्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

यावेळी नदिम काझी, सुरेश पाटील, जनार्दन पाटील, शफी बागवान, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर कोळी, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष अमजद पठाण, जिल्हा सचिव जमील शेख, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मनोज सोनवणे जाकीर बागवान, प्रदीप सोनवणे जगदीश गाडे, विष्णू घोडेस्वार, दीपक सोनवणे, योगेश देशमुख, सुरेंद्र कोल्हे,सागर सपके, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल, भाऊसाहेब सोनवणे, परवेज पठाण उपस्थित होते.

Web Title: Congress supports farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.