काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST2021-06-22T04:13:07+5:302021-06-22T04:13:07+5:30

जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले हे बुधवारी २३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भुसावळ, ...

Congress state president Nana Patole in the district tomorrow | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जिल्ह्यात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जिल्ह्यात

जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले हे बुधवारी २३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भुसावळ, जळगाव, अमळनेर येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २४ रोजी ते धुळे येथे रवाना होणार आहेत.

त्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ९.३० वाजता फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आंदोलन व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. जामनेर, बोदवड व भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा सकाळी ११.३० वाजता भुसावळ येथे होणार आहे. दुपारी १ वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बैठक, दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी ५ वाजता काँग्रेस भवनात संवाद, रात्री ८ वाजता अमळनेर येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद, रात्री ९. ३० वाजता किसान काँग्रेसची अमळनेर येथे बैठक, रात्री साडेदहा वाजता धुळ्याकडे ते रवाना होणार आहेत.

Web Title: Congress state president Nana Patole in the district tomorrow