नेते व कार्यकत्र्याच्या दांडीने काँग्रेस सरचिटणीस यांनी घेतला दालनात आढावा

By Admin | Updated: April 20, 2017 17:31 IST2017-04-20T17:31:55+5:302017-04-20T17:31:55+5:30

सभागृहातील बैठक टाळली : जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष अनुपस्थित

The Congress General Secretary took a review of the meeting with the leader and activist | नेते व कार्यकत्र्याच्या दांडीने काँग्रेस सरचिटणीस यांनी घेतला दालनात आढावा

नेते व कार्यकत्र्याच्या दांडीने काँग्रेस सरचिटणीस यांनी घेतला दालनात आढावा

 जळगाव,दि.20- पदाधिकारी व पुरेसे कार्यकर्ते नसल्याने काँग्रेसचे सरचिटणीस तथा ओबीसी विभागाचे समन्वयक कल्याण दळे यांनी काँग्रेस भवनातील दुस:या मजल्यावरील सभागृहात बैठक टाळत जिल्हाध्यक्षांच्या दालनानजीकच्या एसी (वातानुकूलित) दालनामध्येच उपस्थित पदाधिका:यांशी संवाद साधला. 

दुपारी 1 वाजता दळे यांची बैठक निश्चित केली होती. पण दळे हे दुपारी 1.35 च्या सुमारास आले. दळे यांनी सभागृहात बैठक घेऊ, अशी सूचना केली. पण पुरेसे कार्यकर्ते पदाधिकारी नसल्याने ही बैठक सभागृहात घेण्यास काही उपस्थित पदाधिका:यांनी नकार दिला. अखेर जिल्हाध्यक्ष यांच्या दालनानजीकच्या एका वातानुकूलित दालनामध्येच दळे यांनी संवाद साधला. या वेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, विष्णू घोडेस्वार व रावेर लोकसभेतील युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते. दुपारी फक्त 15 ते 18 पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: The Congress General Secretary took a review of the meeting with the leader and activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.