ग्रामीण रुग्णालयास कॉम्प्युटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST2021-05-28T04:13:58+5:302021-05-28T04:13:58+5:30

भुसावळ : रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत सुधीर पाटील यांनी दैनंदिन जीवनातील अनावश्यक खर्च टाळत समाजभान ठेवून ग्रामीण ...

Computer visit to rural hospital | ग्रामीण रुग्णालयास कॉम्प्युटर भेट

ग्रामीण रुग्णालयास कॉम्प्युटर भेट

भुसावळ : रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत सुधीर पाटील यांनी दैनंदिन जीवनातील अनावश्यक खर्च टाळत समाजभान ठेवून ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक प्रणालीचे कॉम्प्युटर भेट दिले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी यांच्या मागणीनुसार कोरोनाकाळात काम सुलभ होण्याच्या उद्देशाने ही भेट दिली आहे. अनिकेत पाटील आणि टीम प्रत्येक वेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लढ्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळात विविध स्तरातील व्यक्ती मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. आपण समाजाचे नक्कीच काही तरी देणे लागतो व आपण समाजाच्या कामी आलोच पाहिजे या भावनेतून अनिकेत पाटील यांनी हे कार्य केले. या वेळी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, नगरसेवक सुनील नेवे, नगरसेवक वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, मुकेश पाटील, बोधराज चौधरी, किरण कोलते, प्रमोद पाटील, राजकुमार खरात, संदेश सुरवाडे, प्रशांत नरवाडे, देवा वाणी, सुमित बराटे, दिनेश नेमाडे, सागर वाघोदे, पृथ्वीराज पाटील, सागर साळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Computer visit to rural hospital