सेवानिवृत्त सैनिकाने दिले शाळेला संगणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:43+5:302021-08-19T04:21:43+5:30
त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर गावातून आपली मिरवणूक काढून गाजावाजा न करता मिरवणुकीसाठी व अन्नदानासाठी येणारा खर्च न करता हा खर्च ...

सेवानिवृत्त सैनिकाने दिले शाळेला संगणक
त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर गावातून आपली मिरवणूक काढून गाजावाजा न करता मिरवणुकीसाठी व अन्नदानासाठी येणारा खर्च न करता हा खर्च सत्कारणी लावण्याच्या हेतूने आपल्या गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या लहान चिमुकल्यांना प्राथमिक स्तरापासूनच डिजिटल तंत्रज्ञानाचे दृष्टीने संगणकीय ज्ञान अवगत व्हावे व ते या अत्याधुनिक युगातील स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत या उदात्त हेतूने एक लाख रु.पर्यंत खर्च करून त्यांनी शाळेसाठी चार संगणक संच भेट देण्याचा मानस शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर परदेशी व मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे यांच्याजवळ व्यक्त केला होता. परंतु याठिकाणी घेणारे हात अपूर्ण पडले मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे यांनी त्यांना सांगितले की आमच्या शाळेत आम्ही फक्त दोनच शिक्षिका नियुक्त आहोत, त्यामुळे आम्हाला चार संगणक नको त्याऐवजी सोबत प्रिंटर द्यावे म्हणून आपण आम्हाला फक्त दोन संगणक संच व प्रिंटर द्यावे, असे सुचविले. त्याप्रमाणे जगदीश परदेशी यांनी सरपंच सुमन वाघ, उपसरपंच राजेश सोनवणे, पो.पा. ज्योती परदेशी, अंगणवाडी सेविका नंदा परदेशी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष आशा पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर परदेशी यांना हे संगणक संच व प्रिंटर सुपुर्द केले. तसेच विद्यार्थ्यांना संगणक हाताळणीदेखील शिकविण्याचे शिक्षण देण्याचे सांगितले.
तत्पूर्वी येथील ध्वज फडकवण्याचा मान जगदीश परदेशी यांना देण्यात आला. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षिका सुषमा गोसावी यांनी मानले.
फोटो ओळ : ईश्वर परदेशी यांच्या डे संगणक संच व प्रिंटर देताना जगदीश परदेशी व सोबत उपस्थित मान्यवर. छाया - हेमशंकर तिवारी,वरखेडी