जामनेरात स्टँप मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 22:21 IST2021-05-17T22:20:37+5:302021-05-17T22:21:00+5:30
स्टॅंप विक्रेत्यांकडे गेल्या दोन महिन्यापासुन स्टॅंप उपलब्ध नसल्याने नागरीकांना भटकंती करावी लागत आहे.

जामनेरात स्टँप मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : येथील स्टॅंप विक्रेत्यांकडे गेल्या दोन महिन्यापासुन १०० व त्यापेक्षा जास्त शुल्काचे स्टॅंप उपलब्ध नसल्याने नागरीकांना स्टॅंपसाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कोशागार कार्यालयातुन वितरण केले जात असते.
याबाबत विचारणा केली असता जामनेर कोशागारातुनच स्टँप मिळतील असे सांगण्यात आले. जामनेर कोशागार कार्यालयाने स्टॅंपची मागणी केलेली नसून पुढील आठवड्यात येतील असे उत्तर मिळत असल्याचे नागरीकांची तक्रार आहे.
जामनेरला सुमारे ४० परवानाधारक स्टॅंप विक्रेते असले तरी मोजके ४ ते ६ जण स्टॅंप घेतात. याबाबत वकीलांनी तहसीलदारांकडे स्टॅंपचा सुरळीत पुरवठ्याबाबत तक्रार केली होती. स्टॅंपच्या तुटवड्यामुळे तालुक्यातील नागरिक शेजारील सोयगावहून स्टँप आणतात. उपकोषागार कार्यालयाने तातडीने स्टॅंप उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
दैनंदिन कामे खोळंबत असल्याने नाराजी
सध्या अनेकांना शेती विषयक कर्ज घेण्यासाठी तसेच अन्य शेतीच्या कामांसाठी स्टँपची गरज असते. मात्र ते मिळत नसल्याने विविध वेंडर्सच्या घरी शेतकरी वर्ग फेऱ्या मारत असतो. स्टँप आज मिळणार, उद्या येणार अशीच उत्तर त्यांना मिळत असतात. स्टँप मिळत नसल्याने काही जणांनी तर थेट जळगाव गाठून तेथून स्टँप खरेदी केल्याचे समजते. मात्र कोरोनाच्या काळात प्रवासाची वेळ येऊ नये असे प्रशासनाचे म्हणणे आहे.