प्रशांत भूषण यांच्याविरोधात ब:हाणपूर पोलिसात तक्रार

By Admin | Updated: April 3, 2017 15:56 IST2017-04-03T15:56:28+5:302017-04-03T15:56:28+5:30

स्वराज्य अभियानाचे पदाधिकारी तसेच प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.प्रशांत भूषण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा या आशयाची तक्रार सोमवारी दुपारी ब:हाणपूर पोलिसात दिली आहे.

Complaint against Prashant Bhushan; | प्रशांत भूषण यांच्याविरोधात ब:हाणपूर पोलिसात तक्रार

प्रशांत भूषण यांच्याविरोधात ब:हाणपूर पोलिसात तक्रार

 ब:हाणपूर, दि.3 - हिंदू धर्मियांचे प्रेरणा स्त्रोत भगवान श्रीकृष्ण यांची रोमिओंसोबत तुलना केल्याप्रकरणी स्वराज्य अभियानाचे पदाधिकारी तसेच प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.प्रशांत भूषण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा या आशयाची तक्रार सोमवारी दुपारी ब:हाणपूर पोलिसात दिली आहे.

डॉ.मनोज अग्रवाल यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सकाळी 9 वाजता आपल्या टि¦टर अकाउंट पाहत असताना स्वराज्य अभियानाचे पदाधिकारी व ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या विषयी अशोभनीय टिप्पणी केली होती. भगवान श्रीकृष्ण यांची तुलना त्यांनी रोमिओ सोबत केल्याने देशातील कोटय़वधी नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी काश्मिर राज्याला भारतापासून वेगळे करावे असे वक्तव्य केले होते. अॅड.प्रशांत भूषण यांच्याविरूद्ध कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

Web Title: Complaint against Prashant Bhushan;