चाळीसगाव, जि. जळगाव - अंजली दमानिया या विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर खोटे आरोप करीत असून यामुळे नेत्यांसह पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. दमानिया यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याविरोधात कै. लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंचाच्या पदाधिका-यांनी रविवारी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात एकत्र येऊन अंजली दमानियांविरोधात तक्रार देत कलम ४९९, ५००, ५०१ नुसार गुन्हा दाख करण्याची मागणी केली आहे.भाजपाच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यावेळी माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, टाकळी प्र.चा.मा. सरपंच किसनराव जोर्वेकर, नगरसेवक सुरेश स्वार, भाजपा किसान मोचार्चे उपाध्यक्ष कैलास सुर्यवंशी, पालिकेतील भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, उद्धवराव माळी, शेषराव पाटील, राजेश राठोड, प्रेमचंद खिवसरा, अविनाश चौधरी, संजय पितांबर चौधरी, जितेंद्र वाघ, भगवान आगोणे,अरुण पाटील, विवेक चौधरी, राकेश नेवे, राजेंद्र मांडे,राजु पगार, योगेश खंडेलवाल, संजय चौधरी, रुपेश पाटील रमेश चौधरी, संजय पाटील, भाऊसाहेब जगताप,अरुण जाधव, संजय वामन चौधरी सचिन स्वार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
चाळीसगाव येथे अंजली दमानिया यांच्याविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 15:04 IST