तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:10+5:302021-08-26T04:20:10+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित स्व. ...

Comparative literature keeps Indian identity alive | तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते

तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित स्व. डॉ. तेजपाल चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाइन राष्ट्रीय व्याख्यानमालेचा बुधवारी समारोप झाला.

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, केंद्रीय हिंदी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार शर्मा, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा. योगेश पाटील, समीक्षक डॉ. दिनेश चौबे, विभागप्रमुख डॉ. सुनील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चौबे यांनी भारतीयसंदर्भात तुलानात्मक साहित्य यावर भाष्य केले. तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते. नवीन संदर्भ आणि नवीन रूप यांची सांगड घालून तुलनात्मक साहित्य नवीन संदर्भांना जन्म देते, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनिलकुमार शर्मा म्हणाले की, डॉ. तेजपाल चौधरी यांनी भाषेचा सेतू म्हणून काम केले. दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ. तेजपाल चौधरी यांच्या साहित्याची स्तुती करताना डॉ. चौधरी यांनी प्रखर राष्ट्रभक्ती जागृत केली, असे मत व्यक्त केले. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांनी विद्यापीठाच्या भाषा प्रशाळेचा पाया रचण्यात डॉ.तेजपाल चौधरी यांचे मोलाचे योगदान होते. असे सांगितले. डॉ. रोहिदास गवारे व डॉ. प्रीती सोनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ऊर्मिला पाटील व पूजा निचोळे यांनी आभार मानले.

Web Title: Comparative literature keeps Indian identity alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.