संस्कार ग्रुपतर्फे सामूहीक गीता पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 21:03 IST2019-12-09T21:02:56+5:302019-12-09T21:03:09+5:30
जळगाव : शहर आणि परिसरात गीतजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्कार परिवारातर्फे आनंदनगर येथे सामूहीक गीता पठण कार्यक्रम पार ...

संस्कार ग्रुपतर्फे सामूहीक गीता पठण
जळगाव : शहर आणि परिसरात गीतजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्कार परिवारातर्फे आनंदनगर येथे सामूहीक गीता पठण कार्यक्रम पार पडला. यामध्ये १७ मंडळांनी सहभाग घेतला. या परिवारातर्फे ३१ डिसेंबरला ज्ञानेश्वर मंदिर, प्रतापनगर येथे सुंदरकांड पठण होणार आहे. गीताजयंतीनिमित्त लहान मुलांना भगवत्गीता म्हणजे काय, याचे ज्ञान व्हावे, या हेतूने गीतापठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी २ वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उज्ज्वल स्कूलसह परिसरातील विविध पाच शाळांचे विद्यार्थी या सामूहीक गीतापठण कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकूण १७ मंडळांनी यामध्ये भाग घेतला. त्यामध्ये कॅम्प ग्रुप, उज्ज्वल स्कूल, राज्यस्थानी मंडळ, आदर्श महिला मंडळ, गुजराती महिला मंडळ, पंचमुखी हनुमान गीता परिवार, गणगोर महिला मंडळ, स्वर्णकार वर्मासमाज, दत्तकॉलनी गीता परिवार, अयोध्यानगर ग्रुप, नन्हे मुन्हे बच्चोंकी दुनिया, आदिशक्ती मंडळ, दुर्गा सप्तशती मंडळ, पाळधी सखी मंडळ, प्रेमनगर महिला मंडळ, गजानन महिला गीता ग्रुप, तसोद कन्या मंडळ या मंडळांचा समावेश होता.
२ ते ५ वर्षे वयोगटातील मुलेही सहभागी
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे २ ते ५ वर्षे वयोगटातील मुलेही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. नन्हे मुन्हे बच्चे की दुनिया या स्कूलच्या मुलांनी या गीतापठण कार्यक्रमात भाग घेतला.