इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 05:10 IST2019-03-06T05:10:03+5:302019-03-06T05:10:22+5:30
दहावीच्या इंग्रजीच्या पेपराला सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार वरणगाव (ता. भुसावळ) येथील महात्मा गांधी विद्यालयात मंगळवारी उघडकीस आला.

इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी
जळगाव : दहावीच्या इंग्रजीच्या पेपराला सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार वरणगाव (ता. भुसावळ) येथील महात्मा गांधी विद्यालयात मंगळवारी उघडकीस आला. भरारी पथकाने दिलेल्या भेटीत उत्तरपत्रिका पाहिल्या असता ३९८ विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरे सारखीच आढळली. पथकाने भुसावळ येथील बी़ झेड़ उर्दु हायस्कूल येथे दुपारी विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली़ यात एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांवरच उत्तरे लिहिलेली आढळली़ तर याच हायस्कूलमधील एका वर्गात स्वत: पर्यवेक्षिकाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पेपरात उत्तरे लिहिली़ या पर्यवेक्षिकासह दोन विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केली.