पाचोरा तालुक्यातील माहेजी येथे शवपेटीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:08 IST2019-03-26T22:06:06+5:302019-03-26T22:08:09+5:30
माहेजी, ता.पाचोरा येथील चिचखेडे-माहेजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने गावासाठी शवपेटी दिल्यानंतर तिचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील माहेजी येथे शवपेटीचे लोकार्पण
सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : माहेजी, ता.पाचोरा येथील चिचखेडे-माहेजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने गावासाठी शवपेटी दिल्यानंतर तिचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले.
नोकरीकामी बाहेरगावी गेलेले व घरी असलेले ज्येष्ठ नागरिक यांची अचानक घडलेली घटना आणि बाहेरून येण्यासाठी लागणारा वेळ, तोपर्यंत मृतदेहाची होणारी स्थिती लक्षात घेता नातेवाईकांना मृतकाचे अंत्यदर्शन सुस्थितीत व्हावे यासाठी शवपेटीची स्थानिक पातळीवर गरज होती. ही बाब हेरून संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी वैयक्तिक खर्चातून ही शवपेटी उभारली. तिचे चेअरमन सुनील विठ्ठल पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यासाठी ईश्वर गणपत पाटील, लालचंद ओमकार पाटील, प्रल्हाद शिंदे, बडगुजर, सुधाकर बोरसे, पंडित दोधू पाटील, समाधान मुरलीधर बडगुजर, रवींद्र दयाराम पाटील, शेनपडू राजाराम पाटील, साळवे, सखुबाई पाटील, उमाबाई जगन पाटील, सचिव विलास सिकडू शिरसाठ, अनिल संतोष पवार आदींचे सहकार्य लाभले.