शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?; एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 19:55 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये सभा घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये जाहीर सभा घेत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र जनेतेने आम्हाला स्वीकारलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

जळगावात गुलाबराव पाटलाचे प्रस्थ आहे. मात्र गुलाबराव पाटलांना हिणवले जाते. कुणीही हिणवण्याचे काम करू नये, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसेच  सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय, असंही एकनाथ शिदेंनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजता विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांचा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आकाशवाणी चौकात विजय कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधू कोल्हे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पियुष कोल्हे उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष केला. त्यानंतर भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना बैलगाडी देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश महाजन, आमदार संजय सावकारे, नगरसेविका गायत्री राणे, उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, नगरसेवक विशाल त्रिपाठी उपस्थित होते. त्यासोबतच काशीबाई उखाजी कोल्हे शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांचे आकाशवाणी चौकात स्वागत केले. या स्वागतासाठी चौक भगव्या रंगात सजविण्यात आला होता.

विमानतळावर महापौरांची उपस्थिती-

महापौर जयश्री महाजन या विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला उपस्थित होत्या. राजशिष्टाचार म्हणून शहरात येणारे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी महापौरांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यानुसार यावेळी महापौर उपस्थित होत्या. विमानतळावर मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे उपस्थित होते

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगावMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार