ढगाळ वातावरणाचा तूर पीकाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:03 IST2018-12-02T22:01:33+5:302018-12-02T22:03:41+5:30
तुरीचा अत्यल्प पेरा, वातावरणातील बदलामुळे ऐन फलधारणेच्या काळात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीचे उत्पन्न घटून यंदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

ढगाळ वातावरणाचा तूर पीकाला फटका
तळेगाव, ता.जामनेर : तुरीचा अत्यल्प पेरा, वातावरणातील बदलामुळे ऐन फलधारणेच्या काळात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीचे उत्पन्न घटून यंदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
कमी पावसामुळे यंदा कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी बाजरी, कडधान्य या सर्व पिकांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा आता कापसातील जोड पीक म्हणून पेरलेल्या तूर या पिकावर केंद्रित झाल्या आहेत. हे पीक शेतकºयांसाठी उन्हाळी मशागतीसाठी लागणारा पैसा उपलब्ध करून देणारे असते. हे पीक साधारणत : फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास शेतकºयांच्या हातात येते. तुरीच्या विक्रीतून शेतकºयांच्या हातात आलेला पैसा हा मशागतीसाठी वापरता येत असतो. मात्र यावर्षी तुरीचा पेरा कमी आहे. त्यामुळे डाळीचे भाव वाढलेले आहेत. मात्र निसर्गातील बदलामुळे या पिकावर किडीचे प्रमाण जास्त आहे. सध्या तुरीच्या पिकाची अवस्था फलधारणाची असल्याने त्यावर किडीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे या पिकावर रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याने शेतकरी चिंतीत आहे. सध्या थंडी कमी असल्याने फटका बसण्याची शक्यता आहे.