तळेगावसह परिसरात ढगफुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:33+5:302021-09-08T04:21:33+5:30
तळेगाव येथील नदीला मोठा पूर आल्याने बस स्थानक परिसरातील घरे व दुकाने पूर्णपणे पाण्यात गेली असून, ग्रामपंचायत कार्यालयातही पाणी ...

तळेगावसह परिसरात ढगफुटी
तळेगाव येथील नदीला मोठा पूर आल्याने बस स्थानक परिसरातील घरे व दुकाने पूर्णपणे पाण्यात गेली असून, ग्रामपंचायत कार्यालयातही पाणी घुसल्याने ग्रामपंचायतीचेही दप्तर ओले झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पाण्याचा फटका शेतीलाही मोठ्या प्रमाणात बसला असून, ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव शेळगाव कासली सावरला परिसरातील शेतीचेही पंचनामे करण्याची वेळ आली आहे.
सुधाकर भिवसन हिवाळे, सुपडाबाई समाधान कांबळे, कडुबा कोळी, तसेच मन्यार बंधू यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंची पूर्णपणे नासाडी झाली आहे. बस स्थानक परिसरातील हॉटेल व दुकान पान टपऱ्या याही पाणी शिरल्याने दुकानातील सामान यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चाैकट
सावरला येथील महिला ॲम्बुलन्समधून जामनेर येथे हॉस्पिटलला नेत असताना, तळेगावमध्येच अडकल्याने पुराच्या पाण्यातून त्या महिलेला तळेगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागले.
070921\img-20210907-wa0090.jpg
??????? ??????