शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 08:56 IST

Jalgaon Rain Alert: जळगाव तालुक्यातील पाचोरामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली गेली.

-श्याम सराफ/उत्तमराव मनगटे, पाचोरापाचोरा ( जि. जळगाव) तालुक्यातील घाट माथ्यावर सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे असून, नदीकाठच्या शेतांमधील पिके वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली. 

वरखेडी  येथील बहुळा नदीला मोठा पुर आला आहे. नदीकाठच्या शेताचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे, शिंदाड व डोंगर माथ्यावरील ढगफुटी सदृश्य पावसाने शिंदाड, वडगाव कडे, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे पिंप्रि या भागात मोठे नुकसान नुकसान झाले आहे.  

नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसून खूप मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. नदीकाठच्या शेतांमधील पिके वाहून शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

निभोरा येथील नदीचे पाणी

पाचोरा शहरापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर असा पूर आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक गावांमध्ये ग्रामस्थ रात्रभर झोपलेच नाही. मिळेल तेथे आश्रय घेऊन ग्रामस्थांनी रात्र काढली.

खानदेश आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला 

सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) : सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खानदेश आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.

सातगाव डोंगरी, सार्वे या गावातून पाचोरा येण्यासाठी संपर्क तुटला आहे. सातगावपासून चार किलोमीटरवर असलेल्या पिंप्री गावात महापुराचे पाणी घुसताना गाव थोडक्यात बचावले. सातगाव डोंगरी आणि पिंप्रीचे नागरिक सोमवारी रात्री दोन वाजेपासून जागी आहेत.

सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदाड मंडळातील 15 गावातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजJalgaonजळगाव