बचत गट बनवणार कापडी पिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:04+5:302021-06-02T04:14:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नियोजन विभाग यांच्यामार्फत मानव विकास मिशन कार्यक्रम ...

बचत गट बनवणार कापडी पिशव्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नियोजन विभाग यांच्यामार्फत मानव विकास मिशन कार्यक्रम जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर या तीन तालुक्यात राबविला जात आहे. यात बचत गटातील महिला प्रदूषण नियंत्रण मंडळाला २० हजार कापडी पिशव्या पाठवणार आहे.
यात प्रत्येक युनिट इंडस्ट्रियल मशीन, कापड कटींग मशीन, स्क्रीन प्रिंटिंग मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. बचत गटातील महिलांना रोजगार व काम मिळावे, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या युनिटला काम देण्यात आले असून, त्यांच्याकडून २० हजार कापडी पिशवी शिवून घेतल्या जाणार आहे. या तीन तालुक्यातील ९० महिला हे काम करणार आहेत. या महिलांना चार रुपये प्रति पिशवी मिळणार आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्यासाठी मदत केल्याचे जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक यांनी कळविले आहे.