यावल, जि.जळगाव : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दोनशे सदस्यांनी रविवारी येथील पटेल कब्रस्तानच्या सुमारे सात एकरात स्वच्छता मोहीम राबवून धार्र्मिक सलोख्याचा संदेश दिला आहे.येथील सुर नदीच्या तीरावरील पटेल कब्रस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे, गवत, अनावश्यक वनस्पती वाढलेली होती. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे दोनशे सदस्यांनी रविवारी सकाळपासून दुपारी बारापर्यंत पटेल कब्रस्तान परिसर चकाचक केला. यात १५ ट्रॉली कोरडा कचरा गोळा करून बाहेर टाकण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने पटेल कब्रस्थानमध्ये केलेले हे कार्य म्हणजे धार्र्मिक सलोख्याचा जणू संदेशच दिला आहे. या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. यापूर्वीही प्रतिष्ठानने हिंदू स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविली होती.शहरासह मनवेल, अट्रावल, दहिगाव, सातोद, सौखेडासीम येथील श्री सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत योगदान दिले. सदस्यांनी स्वत: घरुन विळे, कुºहाड, घमेली, फावडे, कुदळ आदी साहित्य आणले होते. कुठलाही गाजावाजा न करता श्री सदस्य आपल्या स्वच्छता मोहिमेच्या सेवेत व्यस्त होते. या कार्याचे पटेल समाजाच्या वतीने कौतुक करण्यात आले.
यावल येथे पटेल कब्रस्थानमध्ये स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:14 IST
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दोनशे सदस्यांनी रविवारी येथील पटेल कब्रस्तानच्या सुमारे सात एकरात स्वच्छता मोहीम राबवून धार्र्मिक सलोख्याचा संदेश दिला आहे.
यावल येथे पटेल कब्रस्थानमध्ये स्वच्छता मोहीम
ठळक मुद्देडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतीष्ठानचा उपक्रमयावल तालुक्यातील २०० सदस्यांचा सहभागउपक्रमाचे समाजातर्फे कौतुक