शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात आयुक्तांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:37 IST

राज्य शासनाच्या सूचना

ठळक मुद्दे ३१ जानेवारीपर्यंत होणार सर्वेक्षण

जळगाव : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये देखील स्वच्छ महाराष्टÑ अभियान राबविण्यात आले आहे. त्यानुसार ४ ते ३१ जानेवारीदरम्यान शहरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांनी या सर्वेक्षणाची पूर्व तयारी व संनियत्रण योग्य रितीने होण्यासाठी मनपा आयुक्तांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचा सक्त सूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत.राज्य शासनाकडून यासंबधी ५ जानेवारी रोजी परिपत्रक काढून यासंबधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयात म्हटले आहे की, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सर्वेक्षणाची पूर्व तयारी व संनियत्रण योग्य रितीने होण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांचे अभिप्राय याबाबतची कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत आयुक्तांना माहिती घ्यावी लागणार आहे.३१ जानेवारी पर्यंत होत असलेल्या सर्वेक्षण कालावधीत आयुक्तांना आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील केवळ मनपाच्या महत्वपुर्ण बैठकांसाठीचे प्रवास अपवादात्मक सोडण्यात आले आले आहे. राजशिष्टाचारानुसार अनिवार्य बाबत वगळता इतर ठिकाणी जाताना मनपा आयुक्तांना नगरविकास विभागाच्या पूर्व व विवक्षित मान्यता घ्यावीच लागणार आहे. तसेच आयुक्तांनी सर्वेक्षण मुल्यमापनातील महत्वाचा घटक असणारे, प्रत्यक्ष निरीक्षण व नागरिकांचे अभिप्राय या घटकांबाबत विशेषत्वाने उत्तम मुल्यांकन होण्याचा दृष्टीने आयुक्तांनी स्वत: आवश्यक खात्री करावी लागणार आहे. तसेच आयुक्तांनी प्रत्येक दिवशी या सर्वेक्षणाच्या मुल्यमापणाच्या दृष्टीने परिपुर्ण नियोजन करावे लागणार आहे.जळगाव मनपापुढे आव्हानया सर्वेक्षणात पात्र ठरण्याचे जळगाव मनपासमोर मोठे आव्हान राहणार आहे. कारण मनपाचे सर्व सर्वेक्षण हे सध्यातरी कागदावरच असल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांना ओला व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र सुविधा मिळत नाही.कचºयाचे विलगीकरण होत नसून शहरातून जमा होणाºया कचºयावर कुठलीही प्रक्रिया देखील होत नसल्याचे पहायला मिळत आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प देखील अनेक वर्षांपासून बंद असून या ठिकणी लाखो क्ंिवटल कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. त्यामुळे देखील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थिती जळगाव मनपाला समोर या सर्वेक्षणात पात्र होण्याचे मोठे आव्हान आहे.पात्र ठरल्यास मिळणार २ कोटींचा निधीस्वच्छतेला चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. देशभरातील ५ हजार १०० शहरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाअंती सर्व महानगरपालिकांना शासनाकडे स्वच्छतेसाठी करण्यात येणाºया उपायोजनांची माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती शासनाकडे पाठविल्यानंतर शासनाच्या समितीकडून शहरात प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर नागरिकांकडून त्यांना मनपाकडून स्वच्छतेच्या दृष्टीने देण्यात येणाºया सुविधांबाबत अभिप्राय मागविले जातील. हे तीन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणानुसार शहरांचे रेटींग ठरविले जाणार आहे. या रेटींगमध्ये शहर पात्र ठरल्यास संबधित महानगरपालिकांना शासनाकडून २ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.