जळगावात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:12 IST2019-12-21T12:12:15+5:302019-12-21T12:12:31+5:30
‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दणाणला परिसर

जळगावात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थन सभा
जळगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंच, जळगाव व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थन सभा झाली. स्वातंत्र्य चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचले. या सभेमध्ये अभाविपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय सुरक्षा मंच, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, विहिंप इत्यादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला होता.